समाजातील भेदभाव विशेषत: लिंगधिष्ठित भेदभाव नाहीसा व्हावा आणि समाजात स्त्री पुरुष समानता आणि निकोप वातावरण निर्माण व्हावे यासाठी स्वाधार सतत प्रयत्न करते. या दृष्टीने समाजाच्या सर्व थरातील महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सर्व वयोगटातील मुलामुलींचे, स्त्री-पुरुषांचे प्रबोधन व्हावे यासाठी स्वाधार सातत्याने  ,असे विविध कार्यक्रम आयोजित करते. चालू ज्वलंत विषयावर लोकांशी संवाद साधणारा, लोकांना त्यांची मते मांडण्यासाठी व्यासपीठ देणाराहा उपक्रम राबविते. लोकांना सर्वसामान्य कायद्यांची माहिती देऊन त्यांना सजग नागरिक बनविण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काची व कर्तव्यांची जागृत करण्यासाठी शिबीरे आयोजित करते.

स्त्रियांच्या उन्नतीचा पाया घालणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना दरवर्षी ३ जानेवारी या त्यांच्या जयंतीदिनी स्त्रियांचे आत्मभान जागे करणा-या विषयावरआयोजित करते.

८ मार्च यामहिलांच्या प्रश्नांसाठी समविचारी संघटनांनी एकत्रितपणे केलेल्या एकदिवसीय आंदोलनात स्वाधारचा नेहेमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. आणि त्यानंतर स्वाधारने या प्रश्नांचा पाठपुरावाही केला आहे. याबरोबरच महिला दिनानिमित्त स्वाधार महिलांच्या चालू ज्वलंत प्रश्नावर विचार मंथन करणारा कार्यक्रम -व्याख्यान किंवा परिसंवाद आयोजित करते.

महिलांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी स्वाधार सतत सक्रीय असते. यासाठी स्वाधारने सामान्य महिलांना आणि समविचारी संघटनांना सोबत घेऊन अनेक केली.