आंतरराष्ट्रीय महिला दिन

- रजिया पटेल

आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१९

- मनिषा तुळपुळे

आत्मभानाचे झाड

- उषा मजिठीया

नवी पिढी- नवे विसंवाद

- बागेश्री पारेख

मनातील समजुती-गैरसमजुती

सेंद्रिय खते व आरोग्य

सावित्रीबाई फुले व्याख्यान

- आरती सातवडोके

वस्तीतील महिला मेळावा

आदिवासी पाडयातील
    मुलांसाठी जीवनशिक्षण

आराधना महिला मंडळ, स्त्री कालची, आजची उद्याची.
शैक्षणिक सामाजिक व धार्मिक सुधारणा

आश्रम शाळेस भेट

सुजाण पालकत्व

- डॉ. शुभा थत्ते

श्री. अरुण नाईक (रोप्य महोत्सव)

मनस्विनी ल. र. आणि स्मिता तांबे

संस्थेची स्थापना आणि उद्देश

स्वाधार संस्थेची स्थापना १९८३ साली झुंजार समाजवादी नेत्या मा. मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि टाटा समाजविज्ञान संस्थेच्या ज्येष्ठ प्राध्यापक मा. मीनाक्षी आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सामाजिक व कौटुंबिक समस्येने ग्रस्त स्त्रियांना त्यांची समस्या सोडविण्यासाठी व आत्मसन्मानाने जगण्यासाठी मार्गदर्शन व मदत करणे हे स्वाधारच्या स्थापनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. समाजातील लिंगभावभेद दूर होऊन समाजात स्त्रीपुरुष समानता रुजावी, महिलांना समजात सुरक्षितपणे वावरता यावे या दृष्टीने स्त्रीपुरुषांमध्ये जागृती निर्माण करणे हाही स्वाधारच्या कामाचा महत्वाचा भाग आहे. आजही हे कार्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि हितचिंतकांच्या सहकार्याने सातत्याने चालू आहे.

स्त्रियांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मदत करणे. त्याच बरोबर समाजात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे, समाजात स्त्रीपुरुष समानता रुजावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे स्वाधारचे उद्दिष्ट आहे.

संस्थेचे प्रमुख कार्यक्षेत्र

महिला शिक्षण आणि स्वावलंबन

स्त्रियांना आत्मनिर्भर करुन स्वावलंबी व सक्षम जीवन जगण्यासाठी उभारी देणे आणि मदत करणे हा स्वाधारचा मुख्य आणि मुलभूत उद्देश आहे.

समस्या आणि अडचणी निराकरण

स्त्रियांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक मदत करणे, कौटुंबिक सल्ला देणे आणि जरूर असेल त्याप्रमाणे कायदेशीर सल्ला देणे तसेच कायदेशीर कारवाईसाठी मदत करणे. कौटुंबिक अत्याचाराला व हिंसेला बळी पडलेल्या स्त्रियांना आधार व संरक्षण देणे.

जाणीव जागृती व सामाजिक प्रबोधन

महिलांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देणे, समाजात लिंग समभाव रुजविण्यासाठी काम करणे व अशा प्रकारे काम करणाऱ्या समविचारी संस्थांच्या कार्यक्रमात सहभाग घेणे व त्यांना मदत करणे.