महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी, महिलांना सुरक्षितता आणि सामाजिक राजकीय प्रतिष्ठा मिळण्याच्या दृष्टीने कायदे करण्यासाठी केवळ संस्थात्मक काम पुरेसे नसते. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतात. महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या समविचारी स्त्री संस्था / संघटनांनी केलेल्या आंदोलनात स्वाधारचा नेहेमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. यापैकी बहुतेक आंदोलनांचे नेतृत्व स्वाधारच्या संस्थापक अध्यक्ष मा. मृणाल गोरे यांनी केले आहे.
अशा आंदोलनातील काही प्रमुख आंदोलने —• गर्भलिंगनिदान निवड प्रतिबंध कायदा,
• परित्यक्ता महिलांची परिषद,
• जळगाव वासनाकांड,
• राजस्थान मधील भंवरी देवी बलात्कार प्रकरण,
• दलितांवरील अत्याचाराचे खैरलांजी प्रकरण,
• प्रतिष्ठेच्या नावाने घडणारे विविध गुन्हे
• हुंडा, हुंडाबळी विषयक कायदा
• बालात्कारासंबंधीच्या कायद्यात सुधारणा होण्यासाठी
• विधानसभेत, लोकसभेत ३३% आरक्षण मिळण्याबाबत कायदा होण्यासाठी
• कामाच्या ठिकाणी होणा-या लैगिक छळाविरुध्द कायदा होण्यासाठी
• कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा होण्यासाठी