कायद्यानुसार प्रत्येक आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे अनिवार्य आहे. या समितीचा एक सदस्य सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा एक कार्यकर्ता असणे अनिवाय आहे. स्वाधारच्या समुपदेशक व कार्यकर्त्याना अनेक अस्थापनांनी व महाविद्यालयांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीचा सदस्य म्हणून निमंत्रित केले आहे. या समितीत समुपदेशानाबरोबरच समितीने आयोजित केलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात या सदस्य सक्रीय सहभाग देतात.