क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे ऋण आपण विसरू शकत नाही. सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून स्त्रियांच्या शिक्षणाचे आणि स्वत्त्वाचे रोपटे लावले. मात्र या रोपट्याला आजही खत पाणी घालण्याची गरज आहे. आजही स्त्रियांवरील अन्याय संपलेला नाही, त्यांचे प्रश्न सुटलेले नाही. म्हणून दरवर्षी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त या क्रांतिज्योतीला अभिवाद करण्यासाठी स्वाधार आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट संयुक्तपणे महिलाविषयक चालू ज्वलंत विषयावर त्या विषयातील तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करतो. आजवर या उपक्रमात अनेक विषयांवर विचारमंथन झाले.
उदाहरणार्थ —

विषय वक्ता
१) जागतिकीकरणाचे स्त्रियांवर होणारे परिणाम लता प्र. म. नीला फळणीकर
२) लोकसंख्येंचे धोरण, गरिबी व स्त्रियांचे हक्क मनिषा गुप्ते
३) दहशतवाद निळूभाऊ दामले मी अशी घडले (महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा) प्रफुल्लता दळवी
४) सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख डॉ. कमल पाटणकर
५) ‘दूरदर्शन मालिकांमधील स्त्री प्रतिमा’ लेखिका मनस्विनी ल.र. अभिनेत्री स्मिता तांबे
६) कायदे आपल्या संरक्षणासाठी अ‍ॅड. उज्वला कद्रेकर.
७) अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी श्रीमती रेणू गावस्कर पथनाट्य “स्मरण सावित्रीबाई फुले”
८) स्त्री पुरुष समानता – समाज गैरसमज नि. न्या. लक्ष्मी राव
९) आजची स्त्री खरच स्वतंत्र आहे का? अ‍ॅड. मनिषा तुळपुळे
१०) आजची स्त्री खरच स्वतंत्र आहे का? मंगला मराठे
११) महिला प्रश्नांची चर्चा कां होते? अलका गाडगीळ
१२) लाटणे मोर्चाची पन्नाशी सुरेखा दळवी, संजीव साबळे, ललिता भावे, मंगल पाध्ये