सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कायदे, व्यक्तिगत कायदे यांचे ज्ञान प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. आपल्यावर होणा-या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी, अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी आणि कायद्याच्या धाकाने गुन्हा करण्यापासून माणसाने प्रवृत्त व्हावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही कायदा साक्षरता आम्हाला आवश्यक वाटते. शहरी भागात, वस्ती पातळीवर तसेच ग्रामीण भागातही ही शिबीरे आम्ही घेतो. या शिबीरात विवाहविषयक कायदे, मालमत्तेसंबंधी कायदे, ग्राहक संरक्षण कायदा, हुंडा विरोधी कायदा, घरगुती हिंसाचार विरोधी कायदा, स्त्रिया व लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे कायदे, महिला विषयक कायदे, पोलीस कारवाईची पध्दती इ. बाबत माहिती दिली जाते. अनेक नामवंत वकिलांची या शिबीरात व्याख्याने झाली. २००६-२००७ या वर्षी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने स्वाधारला विधी साक्षरता कार्यक्रमांसाठी अनुदान दिले. स्वाधारच्या सर्व केंद्रांनी व शाखांनी त्यांच्या परिसरात व काही ग्रामीण भागात ही शिबिरे आयोजित केली. अनेक मान्यवर वकिलांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिबिरांत मार्गदर्शन केले. उदाहरणादाखल—

विषय वक्ता
१) महिलाविषयक कायदे अ‍ॅड. गायत्री वागळे, (मुस्लिम स्त्री विषयक कायदे) अ‍ॅड. निलोफर अख्तर, श्रीमती विजया जोशी, अ‍ॅड. हेमांगी विचारे, पो. नि. संजय माने
२) ‘भारताचे सार्वभौमत्व’ डॉ. मालिनी कारकल
३) “स्त्रिया आणि कायदे” निवृत्त पोलीस आयुक्त श्री. अरविंद पटवर्धन, अ‍ॅड. राजू पाटील, अ‍ॅड. क्रांती साठे,
४) मुस्लिम व्यक्तिगत धार्मिक कायदा मॅजि. अरुंधती वालावलकर
६) “स्त्रिया आणि कायदा” श्रीमती लता प्र.म.
७) “कौटुंबिक न्यायालयाची कार्यपध्दती” अ‍ॅड. गायत्री वागळे, अ‍ॅड. नवीना
८) “पोलीस कार्यपध्दती” श्रीमती पौरुचिस्ती सेठना व पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा, श्री. नंदकुमार मेस्त्री
९) “फौजदारी कार्यपध्दती” अ‍ॅड. शीला म्हात्रे
१०) ‘कुटुंब न्यायालय व त्याचे कामकाज’ कौटुंबिक सल्लागार- श्रीमती प्रतिभा घीवला
११) “स्त्रिया आणि कायदे” निवृत्त पोलीस आयुक्त श्री. अरविंद पटवर्धन, अ‍ॅड. राजू पाटील, अ‍ॅड. क्रांती साठे, अ‍ॅड. अच्युत चाफेकर
१२) “स्त्रिया व कायदे” मॅजि. श्रीमती अरुंधती वालावलकर
१३) मुस्लिम व्यक्तिगत धार्मिक कायदा
१४) “स्त्रिया आणि कायदा” श्रीमती लता प्र.म.
१५) “कौटुंबिक न्यायालयाची कार्यपध्दती” अ‍ॅड. गायत्री वागळे, अ‍ॅड. नवीना
१६) “पोलीस कार्यपध्दती” श्रीमती पौरुचिस्ती सेठना व पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा, श्री. नंदकुमार मेस्त्री
१७) ‘कुटुंब न्यायालय व त्याचे कामकाज’ कौटुंबिक सल्लागार- श्रीमती प्रतिभा घीवला
१८)“स्त्रिया व कायदे” अ‍ॅड. अच्युत चाफेकर
१९) महिलांसाठी कायदे अ‍ॅड. मोनिका भगत
२०) कायदा साक्षरता – कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा अ‍ॅड. शुभदा पेठे
२१) पोक्सो कायदा मंगला मराठे