समाजातील व कुटुंबातील त्यांची गुंतागुत आणि उकल यावर फक्त तज्ञांनीच नाही तर प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीने विचार करण्याची गरज आहे ह्या विचाराने स्वाधारने स्वाधारच्या सल्लागार मानसशास्त्रज्ञ श्रीमती प्रभा तुळपुळे यांच्या मार्गदर्शन खाली “संवाद” उपक्रम सुरु केला.
सर्वसामान्य माणसांनी केलेला विचार हा समाजाचा विचार बनतो त्यातूनच समाजमन तयार होते.
समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सामाजिक प्रश्नांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष भाग असते. प्रत्येकाने त्या प्रश्नांचा नकळत तरी विचार केलेला असतो, आपल्यापुरते तरी काही उत्तर शोधलेले असते.
हे सर्व समजून घ्यावे लोकांनी या प्रश्नांवर जाणीवपूर्वक विचार करावा या उद्देशाने हा वार्षिक उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमात आम्ही त्या त्या वर्षीचा विषय वर्तमानपत्रात जाहीर करून लोकांकडून त्या विषयावर लेख मागवतो, त्या लेखकांनी आवर्जून मांडलेले मुद्दे आणि त्याविषयावरील स्वाधारच्या कार्यकर्त्याने लिहिलेला लेख अशी पुस्तिका प्रकाशित करतो.
सांगता समारंभात या पुस्तिकेचे प्रकाशन होते. व या विषयातील तज्ञांना निमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते.
आजवर या उपक्रमात हाताळलेले विषय –
१) सासू-सुनेचे नाते बनते कसे बिघडते कसे?
२) स्त्री – स्त्रीची वैरीण आहे का?
३) व्यभिचार
४) दंगलीतील स्त्रियांचा सहभाग
५) महिला आरक्षणाला पुरुषांचा विरोध का?
६) वृध्दांचे प्रश्न
७) नवविवाहितांचे प्रश्न
८) प्रेमविवाहाला विरोध का होतो?
९) बाबा, बापू, माता यांच्याकडे लोक का जातात?
१०) वाढते लैगिक अत्याचार – “कारणे व उपाय”
११) असहिष्णुता