शैक्षणिक उपक्रमातील लाभार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी दरवर्षी शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरात मुलामुलींना आकाशकंदील, भेटकार्डे, कागदी फुले अशा कलात्मक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. आणि त्यांच्या वैचारिक वाढीच्या दृष्टीने व्याख्याने आयोजित केली जातात. कार्यकर्त्यांची कार्यपद्धती अद्ययावत असावी या दृष्टीने कार्यकर्त्यांसाठी सातत्याने कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित केली जातात.
उदाहरणार्थ—-
विषय | वक्ते |
---|---|
१) व्यसनमुक्ती – कार्यकर्त्यांचे ज्ञान , माहिती | डॉ. आशिष देशपांडे |
२) गर्भजल परिक्षा व स्त्री भूण हत्या | डॉ. बाळ इनामदार, प्रा.रविंद्र रु.प. |
३) सामाजिक संस्थेचे कामकाज कसे असावे? | प्रा. मीनाक्षी आपटे कसे करावे? व्यवस्थापनशास्त्र संस्थेचे कार्यालयीन कामकाज कसें करावे? प्रा. मीनाक्षी आपटे कामाचे प्रकार कामाची विभागणी इत्यादी |
४) समुपदेशन कसें करावे? | प्रा. मीनाक्षी आपटे |
५) वैवाहिक जीवनाची शिदोरी | श्री. युवराज मोहिते |
६) संवाद साधण्याची कला | श्री. युवराज मोहिते |
७) कुटुंबातील नातेसंबंध, कुटुंब जीवन, | श्रीम. प्रभा तुळपुळे, श्रीम. प्रज्ञा सराफ, शिक्षणाची गरज, कुमारवय, श्रीम. संगिता सराफ, श्री. विनोद पाठारी, संवाद साधण्याची साधने श्री. सुशील जावळे, श्रीम. प्रतिमा हवालदार |
८) सेवाभावी संस्थेचे स्वरुपव कार्यपध्दती | स्वाधारच्या कार्यकर्त्या |
९) किशोरवयीन मुलींचे शिबीर | डॉ. निलीमा शिंदे, डॉ. राणा सय्यद, “वयात येताना” डॉ. कविता पाथरे, डॉ. शहाना सय्यद, श्रीम. क्षमा अधिकारी. |
१०) विज्ञाधिष्ठीत दृष्टीकोन | श्रीमती अलका चाफेकर |
११) नॅशनल असोसिएशन फॉर | गीता पंडित, शांता नरसिहन, मंगला मराठे. द ब्लाइंड – विवाहपूर्व मार्गदर्शन |
१२) स्त्रियांसाठी योग व प्राणायम | श्रीमती सुधा सुळे |
१३) ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी माहिती, | साधना वैराळे, अॅड. सुरेखा दळवी, हरिहर वाटवे, नीलाताई पटवर्धन, |
१४) मर्दानगी – कार्यशाळा-समाजातील प्रत्येक | स्वाधारच्या कार्यकर्त्या क्षेत्रात दिसणारी पुरुषासत्ता व तिचे परिणाम |